व्हेज कोल्हापुरी – Swati Bankar

The most popular veg dish in Maharashtra

Ingredients
1/4 किलो परसबी कापलेली
1/4 किलो मटार
125 ग्रॅम पनीर तुकडे केलेला
1 मोठा गाजर तुकडे केलेले
2 लहान टाॅमेटो कापलेले
1 मोठी सिमला मिर्ची कापलेली
1 छोटा फ्लॉवर तुकडे केलेला
3 मध्यम कांदे कापलेले
8 ते 10 काजु
7 ते 8 लसुण पाकळया
1 टीस्पून आले थोडे कापलेले
1 टीस्पून अखा मसाला थोडा
2 टेबलस्पून बटर
1 टेबलस्पून लाल तिखट
2 टेबलस्पून मिर्ची पावडर
1 टेबलस्पून गरम मसाला
1 टेबलस्पून धने पावडर
3 ते 4 टेबलस्पून तेल
3 टेबलस्पून पाणी
चवीनुसार मीठ
Recipe
1)पहीला एक पॅन घेऊन त्या मध्ये एक एक करुन सगळया भाज्या डिप फ्राय करुन घेणे.
2)नंतर त्या भाज्या एका भांडयात बाजुला काढुन ठेवुन देणे व 3)पनीर पण फ्राय करुन घेणे
नंतर पॅन मध्ये कांदा व टाॅमेटो घालुन ते तळुन घेणे व एक मिक्सर चे भांडे घेऊन त्या मध्ये कांदा, टाॅमेटो,काजु,आल,लसुण हे एकत्र करुन वाटुन पेस्ट तयार करुन घेणे.
4)नंतर एक कढई घेऊन त्या मध्ये तेल व बटर घालुन घेणे व त्या मध्ये खड़ा मसाला घालुन घेणे व आपण तयार केलेली पेस्ट घालुन ते एकत्र करुन घेणे
5)नंतर त्या मध्ये धने पावडर, मिर्ची पावडर, लाल तिखट,मालवणी मसाला,गरम मसाला व चवीनुसार मीठ घालुन ते एकत्र करुन घेणे
7)नंतर त्या मध्ये आपण फ्राय केलेलया भाज्या व पनीर घालुन ते एकत्र करुन घेणे व थोडे पाणी घालुन 10 मिनिटे शिजवत ठेवणे अशा प्रकारे तयार होईल वेज कोल्हापुरी
Story line
खरी गंम्मत अशी आता माझे बनवलेले पदार्थ पाहून लोक मला जेवणाचीही ऑइडेर देऊ लागले आहेत म्हणजे.. करायला गेले एक आणि झालं दुसरं….