

Super Moist And Yummy Cupcake
Ingredients |
मैदा – 1 1/2 कप बटर – 1 कप सपाट( एक चहाचा चमचाभर कमी केलं तरी चालेल) – बटर कमी केलं तर 1 चमचा तेल 3 – मोठी अंडी पिठी साखर – 1 कप सपाट / पाऊण कप न दळलेली रोजची साखर बारीक रवा – 1 टेबलस्पून दूध – 2 टेबलस्पून बेकिंग पावडर – 1 1/2 टीस्पून खायचा सोडा – अर्धा टीस्पून व्हॅनिला 1 1/4 चमचा |
Recipe |
सर्व वस्तू रूम टेम्परेचर ला असाव्यात जेणे करून केक फुलायला त्याची मदत होते. सर्वात प्रथम बेकिंग डिश ला बटर लावून घ्या आणि थोडा मैदा शिंपडून व्यवस्थित कोटिंग करून घ्या. 2 मोठी भांडी घेऊन अंड्यातील बलक आणि व्हाइट निरनिराळे करून घ्या. आधी अंड्याचे व्हाइट फेसून घ्या. क्रिम चा बिटर असेल तर उत्तमच पण नसेल तर काटा वापरून अंडे छान फेसून घ्या. इतके फेसावे की जेणे करून ते अगदी स्टीफ होईल.भांडे उलटे जरी धरले तरी ते खाली पडणार नाही. ( हे अगदी नाही जमले तरी केक काही वाईट होणार नाही . कधीतरी मी देखील घाईत जास्त न फेटता बनवते आणि तरीही ह्या रेसिपी चा केक उत्तम तयार होतो.) त्यानंतर अंड्याचा बलक ज्या पातेल्यात आहे त्यातच साखर चाळणीने चाळून घेणे, त्यात रुम टेम्परेचर ला असलेलं मऊ बटर घ्या. ( बटर वितळवलेले अजिबात नको. ) आणि बिटर ने व्यवस्थित बिट करून घ्या. ते क्रिमी झालंय असे वाटले की मैद्या घालायचा आहे. मैदा, बेकिंग पावडर, सोडा, रवा हे एकत्र करून किमान 3 वेळा चाळून घ्या. ( मी कपकेक करता किमान 5 ते 6 वेळा चाळून घेते ) ह्या मैद्यातील 1 ते 2 चमचे प्रथम अंड बटर च्या मिश्रणात घालून ते बिटर ने मिक्स करावे. असे करत अजून 1 ते 2 चमचे घालून मिक्स करावे. एग व्हाइट मधील 1 मोठा चमचा भरून ह्या मिश्रणात घाला सोबत दूध आणि व्हॅनिला घालून हे बिटर ने फक्त मिक्स होई पर्यंत च फेटा. त्यानंतर बिटर बाजूला ठेवा. त्यानंतर मैदा आणिएग व्हाइट अस आलटून पालटून एक दोन चमचे घालत मिश्रण फोल्ड करा.( मिश्रण फोल्ड करणे म्हणजे अगदी हलक्या हाताने हळूहळू सगळे मिक्स करणे जेणेकरून एग व्हाइट मधील एअर बबल कमी होणार नाहीत.) झालं केक बॅटर तयार झाले. ओव्हन गरम करून घ्या ( हे तुमच्या ओव्हन प्रमाणे ठरवाय लागेल की टेम्परेचर किती हवे. पण कपकेक्स करता केक पेक्षा कमीच टेम्परेचर असायला हवे ) कपकेक केस कपकेक ट्रे मध्ये लावून घ्या. कपकेक केस फक्त तीन चतुर्थांश च भरतील इतपत बॅटर भरा.सगळ भरून झालं की एकदा ट्रे हलके आपटून घ्या. म्हणजे केक च्या आत मोठे बबल्स तयार होणार नाहीत आणि केक चा top छान तयार होईल. प्रीहीट ओव्हन मध्ये कपकेक ट्रे ठेऊन 145c वर १५ ते २० मिनिटे बेक करा. |
Tips & Tricks |
*हे कपकेक ओव्हन मध्ये व्यवस्थित बेक करा. तयार झालेल्या केक वर आयसिंग करायचे असल्यास ते पूर्ण थंड होऊ द्यावे. हा केक गरमागरम खूपच छान लागतो आणि 3 दिवसांनी तर अजूनच छान. हा केक बिना आयसिंग देखील अतिशय छान लागतो. मला स्वतःला आयसिंग शिवायच जास्त आवडतो. ह्यात मी बरेचदा भरपूर गाजर किसून घालते पण गाजर घातले तर मात्र दूध अजिबात घालायचे नाही. गाजर शिजताना त्यातून जी वाफ निघते तितकं पुरे होत केकला. पण जर कोको पावडर घालायची असल्यास त्यात एक चमचा दूध वाढवावे आणि 1 चमचा तेल सुद्धा अधिक घालावे. कधी भरपूर ड्रायफ्रूटस किंवा चॉकलेट चिप्स देखील घालून करते. त्याची एक वेगळीच मजा. त्यात थोडे घरी केलेलं केक स्पाईस मिक्स आणि रम घालून सर्वात छान लागतो. आयसिंग करता बटर क्रीम किंवा फ्रेश क्रीम वापरू शकता निरनिराळे रंग आणि नोझल्स वापरून फुलांचं डिझाईन दिसत. |