केशर सब्जा सरबत – Madhura Pethe

Saffron Sharbat – Refreshing Drink suitable with Indian food

Ingredients
*केशर सिरप:
केशर 1 लहान चमचा
2 वाटी साखर
1 लिटर पाणी
1/2 चमचा वेलची पावडर*सरबत:
2 मोठे चमचे भरून केशर सिरप
1 चमचा सब्जा
1/2 लिंबाचा रस
साखर आवश्यकता असल्यास
1 चिमुट मीठ
बर्फ 5 ते 6
अर्धा ग्लास थंड पाणी
केशर काड्या / पुदिना पान सजवण्यासाठी
Recipe
केशर सिरप:
वरील सर्व जिन्नस एकत्र करून उकळून घ्यावे. थोडे दाट होत आले की गॅस बंद करून थंड होऊ द्यावे.
सरबता करता केशर सिरप तयार.
हेच सिरप जर गोड पदार्थांकरता वापरायचे असेल तर मात्र थोडे अधिक घट्ट तयार करून घ्यावे. जेणेकरून ते जास्त दिवस टिकेल.सरबत:
सब्जा 10 मिनिटे आधी भिजत घालावा.
केशर सिरप,सब्जा,लिंबाचा रस,साखर आवश्यकता असल्यास,1 चिमुट मीठ,बर्फ 5 ते 6,अर्धा ग्लास थंड पाणी मिक्सर ला फिरवुन घ्यावे.
ग्लास मध्ये सब्जा टाकून त्या वर काही बर्फाचे तुकडे टाकून त्या वर सरबत घालावे.वरून थोडे अजून थंड पाणी घालून त्यावर पुदीना पान किंवा केशराच्या 2 काड्या घालून सर्व्ह करावे.दिवसभरच्या उपवासा नन्तर थंडगार सरबत जेवणा सोबत दिले तर पोटाला थंडावा तर मिळेल च सोबत जेवणाची रुची देखील वाढेल.
Tips & Tricks
हे केशर सिरप अनेक प्रकारे गोड पदार्थांकरता किंवा सरबता करता वापरू शकता. ह्याचाच वापर केशर मस्तानी किंवा फालुदा ह्यात देखील होऊ शकेल.
हेच सिरप जर गोड पदार्थांकरता वापरायचे असेल तर मात्र थोडे अधिक घट्ट तयार करून घ्यावे. जेणेकरून ते जास्त दिवस टिकेल.