जिलेबी – Deepa Gad

Yummy crunchy & sweet snack !

Ingredients
५० ग्राम मैदा (१/२ कप)
1 टेबल स्पून दही
चिमूटभर खायचा केशरी रंग
१५० ग्राम साखर (३/४ कप)
१०० मिली पाणी (१/२ कप)
१/२ टिस्पून लिंबाचा रस
तळण्यासाठी तेल
सजावटीसाठी पिस्ता
Recipe
रात्री एका भांड्यात मैदा, दही, पाणी घालून फेटून झाकून ठेवा. (८ तास)
सकाळी पीठ फरमेन्ट झालेलं असेल त्यात केशरी रंग घालून परत फेटा. दुसऱ्या भांड्यात साखर, पाणी, केशरी रंग घालून एक उकळी आली की गॅस बंद करा व झाकून ठेवा. (आपल्याला एकतारी पाक करायचा नाही फक्त साखर विरघळली की उकळी येऊ द्या)
ग्लासात एक प्लास्टिक पिशवी घेऊन त्यात हे मैद्याचे मिश्रण टाका. वरती गुंडाळून रबर बांधा. पॅनवर तेल तापत ठेवा. मिश्रण भरलेल्या पिशवीचे पुढचे टोक कात्रीने कापा. आता तेल तापले की नाही ते थोडं मिश्रण घालून बघा ते लगेच वर आलं की समजा तेल तापले आहे. आता गोल आकाराच्या जिलेब्या पाडून दोन्ही बाजुंनी भाजून घ्या. आता भाजलेल्या जिलेब्या पाकात टाका ५ मिनिटे मुरू द्या मग ताटात काढा.
गरमागरम जिलेबी प्लेटमध्ये एकावर एक ठेवून पिस्त्याचे काप टाकून सजवा.
Tips & Tricks
जिलेबीचे बॅटर बनविताना बॅटर जास्त घट्ट किंवा पातळ असू नये, एवढी खबरदारी घ्यावी. तसेच पाकात जिलेबी टाकताना पाक कोमट असावा. ५ मिनिटाने पाकातून बाहेर काढावी.