गवारीचा ठेचा – Yogini Lad

Cluster bean chutney, Maharashtrian Delicacy

Ingredients
150 ग्रॅम थोडी मोठी जाडसर गवार तोडून घेणे
४ ते ५ हिरव्या मिरच्या किंवा आवडीप्रमाणे
१ गड्डा सोललेला लसूण
१ मूठभर थोडे भाजलेले शेंगदाणे सालासकट घेणे
१ चमचा जीरे,
जाड मीठ किंवा साधं मीठ चवीप्रमाणे.
Recipe
मिरच्या कढईत तेल न घालता व्यवस्थित भाजून घेणे
त्याच कढईत तोडलेल्या गवारी व्यवस्थित भाजून घेणे.
नंतर खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये आधी मिरच्या ,जाडसर कुटून घ्यावे नंतर गवार, अर्धा चमचा जीरे,मीठ, भाजलेले सालासकट शेंगदाणे जाडसर कुटून घ्यावे.
मिक्सरला केले तर थोडे थांबून फिरवून घ्यावे.
कढईत अर्धा ते १ चमचा तेल घेऊन उरलेले जीरे, ४ ते ५ कढीपत्ता पाने तुकडे करून घालते, २ लसणाच्या पाकळ्या ठेचून घालणे व कुटून घेतलेला ठेचा घालून २ ते ३ मिनीटे व्यवस्थित परतून घेणे.
Yummy tasty ठेचा तयार.. भाकरी बरोबर अप्रतिम लागतो.
Tips & Tricks
कोवळी गवार घेऊ नये त्याने चवीत फरक पडतो. थोडी जाडसर गवार घ्यावी.