
करून बघा एकदा.. फॅन व्हाल या केकचे !
Ingredients |
1and 1/2 कप – मैदा 1tsp – बेकिंग पावडर 1/2 tsp-सोडा 3/4 कप- कंडेन्स्ड मिल्क 1/3 कप- तेल 1/4 कप -पिठी साखर 1tsp – व्हॅनिला इसेन्स 3/4 कप-दूध 1tbsp-कोको पावडर 1tbsp-चॉकलेट सिरप |
Recipe |
सर्वप्रथम मैदा ,बेकिंग पावडर आणि सोडा चाळून बाजूला ठेवावे. एका भांड्यामध्ये कंडेंस्ड मिल्क, तेल ,पिठीसाखर आणि इसेन्स एकत्र करून छान फेटावे. फेटलेल्या मिश्रणामध्ये वर चाळून ठेवलेले कोरडे साहित्य घालावे त्यासोबत थोडे थोडे दूध घालून केकचे मिश्रण तयार करावे. तयार केक च्या मिश्रणाचे समान तीन भाग करावेत. एका भागामध्ये कोको पावडर व दुसर्या भागामध्ये चॉकलेट सिरप घालावे, एक भाग तसाच पांढरा ठेवावा. तयार मिश्रण तेल लावलेल्या केकचा भांड्यामध्ये एका पाठो पाठ असे घालावे. प्रीहीटेड ओव्हनमध्ये 180 डिग्री ला किंवा पंचवीस ते तीस मिनिटे कुकरमध्ये केक बेक करावा. |
Tips & Tricks |
ह्यातच रोज फ्लेवर आणि पिस्ता च कॉम्बिनेशन देखील छान लागते. किंवा टूटीफ्रुटी आणि ऑरेंज फ्लेवर सुद्धा मस्त लागते. |