
A Handy Spice Mix for oriental cooking
Ingredients |
2 tbsp सफेद मिरी 1 tbsp काळी मिरी 1 tsp मीठ 2 tbsp गार्लिक पावडर 1 tsp सुंठ 1 tsp तिरफळ / चायनीज शीचुआन पेपर्स ( आतील बिया काढून ) 2 tsp MSG / Chinese salt 1 tbsp साखर |
Recipe |
वरील सर्व पदार्थ इतके किंवा ह्याच्या पटीत एकत्र घेऊन मिक्सर वर बारीक करून घ्यावे. आणि काचेच्या बरणीत भरून फ्रिज मध्ये स्टोअर करा. हे चायनीज स्पाईस मिक्स वापरून घरी झटपट चायनीज तयार करू शकता.फ्राईड राईस तयार फ्राईड राईस तयार करताना – 2 बाऊल शिजवलेला मोकळ्या राईस वर 1 tsp भुरभुरावी आणि हलक्या हाताने मिक्स करावे. मग तेलावर भाजी, सॉस आणि भात वेगाने फ्राय करून घ्या. फ्राईड राईस एका मिनिटात तयार.स्टर फ्राईड व्हेज / नॉनव्हेज तेलावर व्हेज / चिकन / फिश फ्राय करून त्यात सॉस आणि सिझनिंग पावडर घाला आणि लगेच सर्व्ह करा. |
Tips & Tricks |
MSG नको असल्यास न ती न वापरता सुद्धा करू शकता. परंतु त्याने चव अगदी हॉटेल मधील पदार्थांसारखी येते. ह्यात सफेद मिरी चा वापर आहे – चायनीज ला खरी चव ह्यानेच येते. |
Story line |
आपल्याला चायनीज फूड प्रचंड आवडत न ? आणि भारतात तयार होणार चायनीज जेवण हे भारतीय चायनीज फ्युजन जगात प्रचंड आवडीने खाल्ले जाते. कारण – त्याला दिलेला खास भारतीय टच. जस भारतीय म्हणजे एकाच प्रकारचं जेवण नव्हे तसच चायनीज म्हणजे एकच पद्धतीने तयार केलेलं जेवण नाही. त्यांच्या कडे सुद्धा प्रांता प्रातांत निराळ्या पद्धतीने जेवण तयार करतात. प्रत्येक प्रांतातील काही खास पदार्थ तेथील ओळख सांगतात. चायनीज पदार्थातील सर्वात आवडत्या पदार्थांपैकी फ्राईड राईस हा जगातील सर्वात पॉप्युलर पदार्थ आहे. चायनीज पदार्थात अगदी कमी गोष्टी घालून झटपट पदार्थ तयार होतात. हेच पदार्थ अजून झटपट तयार व्हावेत म्हणून बरेचदा बाजारातून आणलेले चायनीज सिझनिंग मिक्स वापरतात.तेच घरात असलेल्या पदार्थांमधून अगदी 5 मिनिटात करता येत. आणि एकदा तयार केलं की मिक्स व्हेज सॉस, तयार राईस, आणि हे रेडी मिक्स घातलं की झटपट चायनीज पदार्थ तयार. सोबत शिचूआन / शेजवान पेपर्स ने स्वाद अधिकच वाढते. हे पेपर म्हणजे आपल्या कडे कोकणातील पदार्थांमध्ये वापरली जाणारी तिरफळ यांच्या सारखीच असतात.फक्त आकार किंवा रंग ह्यात बदल असतो.त्यांच्याकडे ह्यात पण भरपूर व्हरायटी मिळतात. काही प्रचंड जहाल असतात. तर काही हलक्या स्वादाच्या. मूळ चायनीज काही इथे सहज मिळणार नाहीत परंतु आपल्या तिरफळांच्या आणि चायनीज शेजवान पेपर मध्ये वासा मध्ये फार मोठा फरक नाहीये. मी निरनिराळे चायनीज शेजवान पेपर वापरून बघितले आहेत आणि त्यांची चव जवळपास सारखी असते. कांहींचा वास काळ्या मिरी सारखा थोडा काहींचा सफेद मिरी च्या आसपास असतो.परंतु त्याचा थोडा वापर केला तरी चायनीज पदार्थांची चव मात्र वाढते. हे मिक्स करून बघा आणि कळवा तुमच चायनीज जेवण कस झालं होतं |