सोयाबीन खीमा – Sneha Adhav

Spicy Soya Kheema Masala – Excellent Vegan source of protein

Ingredients
1 Cup सोयाबीन खीमा
1/4 Cup हिरवे वाटाणे
1 tsp गरम मसाला
1/2 tsp जिरे
1 cup बारीक चिरलेला कांदा
1 हिरवी मिरची
1 tbsp आल लसूण पेस्ट
1 tbsp तेल
1 बारीक चिरलेला टोमॅटो
1/2 tsp हळद
1 tbsp धने पावडर
1 tbsp लाल तिखट
1 tbsp दही
चवीनुसार मीठ
Recipe
सर्वात आधी सोयाबीन पाण्यात भिजत ठेवा.
नंतर सोयाबीन मधले सर्व पाणी काढून कोरडे करून घ्या. व मिक्सर मधून जाडसर भरड बनवा.
पॅन मध्ये तेल घाला. तेल गरम झाले की त्यात हिरवे वाटाणे थोडा गरम मसाला, जिरे, बारीक चिरलेला कांदा, 1 हिरवी मिरची, आल लसूण पेस्ट घालून छान परतून घ्या.
आता यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून झाकण ठेऊन शिजवून घ्या.
तेल सुटू लागले की यात हळद, धने पावडर, लाल तिखट, गरम मसाला पावडर घालून मिक्स करा झाकण ठेऊन मसाला छान परतून घ्या.
आता गॅस बंद करून मसाला किंचित थंड करून यात १ चमचा दही (ऑप्शनल) घाला मिक्स करा व गॅस चालू करा. झाकण ठेऊन मसाला छान तेल सुटे पर्यन्त तयार करून घ्या.
आता यात सोयाबीन घालून छान मिक्स करा. झाकण ठेऊन १ मी ठेवा. नंतर यात १ कप किवा अंदाजाने पाणी घाला. (खूप घालू नका). व चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवा.
झाकण काढून मिक्स करा. भाजी ड्राय होऊ पर्यंत स्लो गॅस वर ठेवा. कोथिंबीर घाला. आवडत असल्यास वरुण गरम मसाला आणि १ चमचा तूप घाला.
गॅस बंद करून सोया खीमा सरविंग बाउल मध्ये काढून वरुण आल्याचे तुकडे घालून चपाती, रोटी किवा ब्रेड सोबत खाण्यास घ्या.
(यात मी थोडा मटण मसाला आणि थोडे खोबर्‍याचे वाटण घातले आहे हे पूर्ण ऑप्शनल आहे माझ्या कडे होते म्हणून मी घातले. तासेच टोमॅटो ऐवजी टोमॅटो पेस्ट घातली तरी चालेल. कलर साठी काश्मिरी लाल मिरची पावडर घाला. तुमच्या कडे मॅगी मसाला मॅजिक चे पाकीट असेल तर ते पण वापरू शकता)