बेसन ढोकळा (दही न घालता)- Sneha Adhav

Easy Khaman Dhokla Recipe

Ingredients
1 1/2 बेसन
१/४ tsp हळद (ऑप्शनल)
चवीनुसार मीठ,
साखर १/४ कप (कमी करू शकता),
तेल १/४ कप,
१/२ tsp citric अॅसिड,
१ कप पाणी,
१/२ tsp बेकिंग सोडा,
१ tsp तेल,
१/२ चमचा मोहरी,
कढीपत्ता,
हिरवी मिरची,
चवीनुसार मीठ,
साखर,
कोथिंबीर,
ओल्या नारळाचा कीस…
Recipe
एका बाउल मध्ये १ कप पाणी घ्या. त्यात १/४ tsp हळद (ऑप्शनल), चवीनुसार मीठ, साखर १/४ कप (कमी करू शकता), तेल १/४ कप, १/२ tsp citric ऍसिड घाला आता हे सर्व छान मिक्स करा. सर्व छान विरघळले पाहिजे असे मिक्स करा.
आता यात दीड कप बेसन घाला. आधी १ कप घालून मिक्स करा आणि मग अर्धा कप घाला. छान मिक्स करा गुठल्या नसाव्यात. खूप पातळ किवा खूप घट्ट असे बॅटर बनवू नये.
एका बाउल मध्ये १ चमचा पाणी घ्या त्यात १/२ tsp बेकिंग सोडा घालून मिक्स करा. आणि वरील ढोकळा बॅटर मध्ये घाला. आणि लगेच मिक्स करा. बॅटर हलके सफेद होऊन फुलून डबल झालेले दिसेल. (बॅटर च रंग व्हाइट असा झाला की बॅटर परफेक्ट तयार झाले असे समजावे)
कुकर च्या भांड्याला किवा ज्यात ढोकळा स्टीम करणार त्या भांड्याला तेल लावून त्यात तयार बॅटर ओतावे. हलके टॅब करून घ्या.
हाय फ्लेम वर १० मि. स्टीम करून घ्या. ७. मि. ने एकदा चेक करा.
तयार ढोकळा बाहेर काढून थंड करण्यास ठेवा.
तडका पॅन मध्ये १ tsp तेल घ्या त्यात १/२ चमचा मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, १/२ चमचा citric अॅसिड, चवीनुसार मीठ आणि साखर, आणि पाणी घालून मिक्स करा व फोडणी बनवून घ्यावी.
ढोकळा थंड झाला की त्याचे पीस कट करून घ्या. व त्यावर तयार फोडणी गरम असतानाच चमच्याने छान पसरवून घाला. कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा कीस घालून खाण्यास घ्या.