दाल माखनी / Dal Makhani

पंजाब च्या चवीच्या तोडीसतोड दाल माखनी तयार करणे म्हणजे सुबक सूंदर उत्तम मोदक किंवा परफेक्ट पुरणपोळी तयार करता येण्यासारखे च आहे.

दाल माखनी / Dal Makhani


2 वाटी उडीद
पाव वाटी राजमा ( spotted)
4 चमचे चणा डाळ
1 tbsp शहाजीर
2/ 3 तेज पत्ता
1 टी स्पून जिर
1 बडी वेलची
3/4 हिरवी वेलची
4 मिरी
2 tbsp आलं लसूण वाटण
8 ते 10 मोठे लाल टोमॅटो
2 tbsp क्रीम
250 gm बटर
मीठ
1 tbsp साखर
2 tbsp काश्मिरी मिरची तिखट
1tbsp बेडगी मिरची तिखट
1 tsp मटण मसाला
1 tsp गरम मसाला पावडर
3 चिमुट चाट मसाला
4 / 5 हिरवी मिरची
आलं बारीक चिरून
2 tbsp कसुरी मेथी
3/ 4 tbsp तेल
2 tbbsp धने जिरे पावडर ( धने जिरे प्रमाण 2-1 दोनास एक )

*आदल्या रात्री उडीद, डाळ, राजमा धुवून भिजवून ठेवा.
दुसऱ्या दिवशी पुन्हा धुवून कुकर मध्ये भरपूर पाणी उडीद राजमा आणि डाळ एकत्र घेऊन त्यात 1 tbsp जिर, 1 बडी वेलची 1 मोठं तेज पत्ता घालून शिजवायला ठेवा. कुकर ची पहिली शिटी झाली की पुढे पाऊण तास अगदी बारीक गॅस वर शिजू द्यावे.
नंतर बंद करून निवल्यावर कुकर उघडून पहावे. शिजलेल असेल परंतु घट्ट झालेली नसावी. व्यवस्थित हलवून त्यात पुन्हा थोडे पाणी घालून तसेच दुसऱ्या शिटी नंतर बारीक गॅस वर पाऊण तास शिजवावे.
आता 8 मोठ्या टोमॅटो ची मिक्सर वर प्युरी करून घ्यावी.कढई मध्ये 4 tbsp तेल आणि अर्ध बटर घेऊन त्यात तेज पत्ता आणि शहाजीर घालून परतून घ्यावे.त्यात आलं लसूण पेस्ट परतावी आणि खमंग वास आला की लगेच टोमॅटो प्युरी घालून व्यवस्थित परतून घ्यावे. आणि शिजू द्यावे, अगदी तेल सुटे पर्यंत शिजवावे.

तो पर्यंत कुकर निवलेला असेल. शिजलेल्या टोमॅटो प्युरी मध्ये धने जिर पावडर, कश्मिरी तिखट, बेडगी मिरची तिखट घालून परतावे.आणि मग त्यात शिजलेली डाळ घालावी.
हे आता किमान अर्धा तास मंद आचेवर शिजू द्यावे.डाळ सातत्याने हलवणे अतिशय गरजेचे आहे नाहीतर खाली लागून करपू शकते.
अर्ध्या तासाने त्यात दोन्ही गरम मसाला पावडर, कोरडी गरम करून चुरलेली कसुरी मेथी, उरलेले बटर मीठ, साखर, हिरवी मिरची बारीक चिरून, हिरव्या वेलच्या, 1 तेज पत्ता, 4 मिरी अस सगळं घालून पुन्हा थोडा वेळ शिजवावे.
त्यानंतर त्यात क्रीम घालून घोटून घ्यावी. क्रीम घालत असताना गॅस अगदी बारीक असावा म्हणजे क्रीम फाटत नाही. थोडा वेळ पुन्हा मिक्स करत घोटे पर्यंत डाळ अगदी घट्ट क्रिमी होत आली असेल. गॅस बंद करून रोटी करायला घायची 🙂

टीप :
1)डाळ जेव्हा गरम असते तेव्हा अळू च्या पातळ भाजी इतकी पातळ वाटेल परंतु ती तेवढी असू द्यावी. नंतर जशी निवेल तशी अजून अजून घट्ट होत जाते.
2) संध्याकाळकिंवा दुसऱ्या दिवशी पर्यंत डाळ अधिक तिखट होते असा माझा नेहेमीचा अनुभव आहे. कदाचित सर्व गरम मसाले जे आपण शेवटी टाकतो त्याचा अर्क नंतर उतरत असावा.अधिक तिखट वाटल्यास थोडं घरच तूप घालून गरम करावी।
3) डाळ जितकी जास्त वेळ मंद आचेवर शिजेल तशी त्याची चव अधिक वाढते. म्हणूनच ती गरम मसाला घालायच्या आधी हवी तितका वेळ शिजवावी. नंतर दीर्घकाळ नको. कारण मसाल्याचा हलका स्वाद हवा आहे जो मुख्यतः शहाजीर, तेज पत्ता आणि एकच बडी वेलची ह्याचा मुख्यतः छान लागतो. नंतर चे मसाले आरोमा करता आहेत.
4) हीच डाळ उडदाची साला सकट डाळ वापरून सुद्धा करू शकता. माप तितकंच ठेवा.पण अख्खे उडीद वापरलेत तर मात्र दुसऱ्या कुकर नंतर थोडं पावभाजी च्या मथनी ने रगडून घ्या.

इतका वेळ अगदी हळुवार शिजवलेली डाळ ही अगदी पंजाबी रसोई मध्ये तयार झालेल्या दाल माखनी सारखी होते. हॉटेल मध्ये महाग मिळणारी, ही पसरट डिश मध्ये येणारी इवलीशी डाळ खाऊन काही समाधान मिळत नाही.त्यापेक्षा घरी थोडी मेहेनत करून भरपूर तयार होते आणि तेही अगदी परफेक्ट ??
करून बघा मला खात्री आहे की पहिल्या घासाला माझी आठवण काढाल 😉 ?❤️❤️❤️

Madhura Pethe

3 Comments

  1. Khoop mast. Nakki try karen. Majhya nawaryala khooop aawadate pan banawali nahi. Aata nakki try kare.

Comments are closed.