चिवडा पातळ पोह्यांचा – Alka Pethe

1/2 किलो पातळ पोहे

1 1/2 वाटी शेंगदाणे भाजून सोलून घ्या

50 ग्राम डाळं

1वाटी सुके खोबरे पातळ काप काढून घेणे

काजू तुकडा आवडीनुसार

2 चमचे तीळ

धने जिरे पूड आवडीनुसार

तेल अंदाजे वाटीभर

8 -10 कढी पत्ता

मिरच्या बारीक चिरून घेणे


कृती

पातळ पोहे 1/2दिवस उन्हात वाळवले तर चिवडा हलका होतो.

मोठया पातेल्यात पोहे घेणे व बारीक गॅसवर ठेऊन हळूहळू ढवळत रहा.

12ते 15मिनीटे झाली की पोहे चिमटीने बारीक कुस्करले जात असतील तर गॅस बंद करावा.

थोडे गार झाल्यावर चाळणीने चाळा.

मग त्याच पातेल्यात तेल घालून फोडणी करावी. 2चमचे (फोडणीच्या डब्यातील)मोहरी 2/3 चमचे जिरे 2चमचे हिंग पावडर 3चमचे हळद कढी पत्ता आणि मिरचीचे तुकडे टाकून परतावे. 2/3मिनीटे परतल्यावर खोबरयाचे काप टाकून परतावे ते तांबूस होऊ लागले की शेंगदाणे व डाळं टाकून परतावे व लगेच पोहे टाकून त्या वर मीठ, पिठी साखर धणेजिरे पूड घालून हलक्या हाताने ढवळावे. गॅस बंद करावा.

पातेलं 2फडक्याने उचलून आसडावे म्हणजे चिवडा चांगल्या प्रकारे मिक्स होईल. जमत नसेल तर झारयाने वर खाली करून मिक्स करावा. चिवडा गार झाल्यावर डब्यात भरून ठेवावा.

टीप-फोडणी झाल्यावर गॅस एकदम बारीक करून पुढील सगळी कृती करावी.