चिकन ड्रमस्टिक्स पॉट – मधुरा पेठे

Pot Cooked Chicken Drumsticks -A perfect Party Starter

Ingredients :

8 ते 10 चिकन ड्रमस्टिक्स / लेग्ज
400 ग्रॅम गोड घट्ट दही
1 tbsp तंदुरी मसाला
1 tbsp चिकन मसाला
1 tsp चाट पावडर
1 tbsp धने पावडर
1/2 tbsp जिरे पावडर
1 tsp हळद
2 tsp तिखट
2 tsp कश्मिरी मिरची पावडर
2 tbsp आलं लसूण कोथिंबीर पेस्ट
2 tsp मीठ
1 लिंबू
5 tbsp तेल
2 tsp कसुरी मेथी
2 tbsp बटर

Recipe :

*चिकन ड्रमस्टिक्स मीठ पाण्यात स्वच्छ धुवून घ्या.त्याला सुरीने तिरके कट देऊन घ्या.
*दह्यात तंदुरी मसाला, चिकन मसाला, चाट पावडर, धने पावडर, जिरे पावडर, हळद, तिखट, कश्मिरी मिरची पावडर, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, मीठ, लिंबू, 1 लहान चमचा तेल आणि गरम करून चुरलेली कसुरी मेथी हे सर्व एकत्र करून घ्या.
*वरील दही मसाल्याचे मिश्रणात चिकन टाकून नीट मिक्स करा. चिकन किमान 4 तास किंवा रात्रभर फ्रिज मध्ये मॅरीनेट करायला ठेवा.
*मॅरीनेट झालेलं चिकन थोडा वेळ फ्रिज बाहेर काढून ठेवा.
*जाड बुडाच्या पातेलीत / पॉट मध्ये तळ बुडेल इतपत तेल घ्या. त्यातच बटर टाका. तेल गरम झाल्यावर त्यात चिकन चे सर्व पिसेस आणि उरलेल मॅरीनेट सर्व एकत्र टाका. थोडावेळ मोठ्या गॅस वर परतल्यावर मंद आचेवर झाकण ठेवून चिकन शिजू द्या.
*अधून मधून झाकण उघडून चिकन पिसेस वर खाली करा. सुरुवातीला ह्यात पाणी सुटेल. परंतु चिकन त्यात शिजू द्या. वरून अजिबात पाणी घालू नका. मंद आचेवर सगळीकडून एक सारखे शिजल्यावर चिकन मधील पाण्याचा अंश जाऊन मसाल्याला तेल सुटेल. गरज वाटल्यास घट्ट करा आणि गरमागरम सर्व्ह करा.
चिकन ड्रमस्टिक्स पॉट पार्टी स्टार्टर म्हणून अगदी परफेक्ट आहे. मोठ्या प्रमाणात पार्टी असल्यावर पोटभरीचे चिकन स्टार्टर म्हणून हा पदार्थ सर्वाना आवडतो. सोबतच बारीक चिरलेला कांदा कोबी लिंबू घातलेलं सॅलेड मस्त लागते.