चकली भाजणी : Chakali Bhajani – Alka Pethe

अचूक माप म्हणजे खुसखुशीत चकली !

Ingredients
1 किलो जाडा तांदूळ
1/2 किलो चणा डाळ
1/4 किलो उडीद डाळ
1/4 किलो मूग डाळ
1 वाटी साबुदाणा
1 वाटी धने
1/2 वाटी जिर
15 काळी मिरी
Recipe
वरील सर्व धान्य खमंग भाजून घ्यावेत.
जिर आणि धने हलके भाजावे
सर्व एकत्र करून दळायला द्यावे.
भाजणी अगदी बारीक दळू नये, खसखशीत दळून घ्यावी.
दळलेली भाजणी घट्ट झाकणाच्या डब्यात स्टोअर करावी.
ह्या भाजणीच्या खमंग आणि खुसखुशीत चकल्या तयार होतात.
Tips & Tricks
भाजणी अगदी मैद्यासारखी दळली तर चकली कुरकुरीत न होता कडक होते, म्हणून खसखशीत दळावी.
भाजणी खमंग भाजावी म्हणजे 6 महिन्यापर्यंत छान राहते
चकली भाजणी मध्ये साबुदाणा ने खुसखुशीत होतात.

6 Comments

  1. पीठ थंड पाण्यात मळायचे कि कोमट पाण्यात

  2. Supper mam ,ya madhe telache mohan ghalayche ki tupache v kiti mohan ghalave, chakali masala vaparava ka yachi purn mahiti milel ka.

  3. भाजणीचे धान्य धुऊन सुकऊन मग भाजायचे का खमंग , न धुता भाजून केले तर चालते का

Comments are closed.