गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे – स्मिता लोणकर

Gavhachya pithache shankarpale?

चहासोबत तोंडात टाकण्यासाठी नेहमी काहीतरी हवं असतं. सारखे सारखे सारखे बिस्कीट पण नको वाटतं आणि बिस्कीट म्हणले की मैदा पोटात जातोच मग मनात अपराधी असल्यासारखे वाटत असतं मैदामुळे वजन वाढते की काय ? मग म्हटलं आता मैदा नकोच मग आता काय ?म्हटलं गव्हाच्या पिठापासून काहीतरी करून पाहावं मग काय घातला घाट तेवढेच मनाची समाधानी? चला तर मग पाहूया.

गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे
साहित्य:-दोन वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी साखर,अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी पाणी,तळण्यासाठी तेल किंवा तूप.
कृती:-एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकावे.आणि पातेले गॅसवर ठेवावे फक्त साखर विरघळेपर्यंत भांडे गॅसवर ठेवावे. साखर विरघळली की भांडे लगेच खाली उतरवावे.दुसऱ्या भांड्यात अर्धी वाटी तूप घालून तूप गरम करावे.आता साखरेचे पाणी थोडे थंड झाले असेल त्यामध्ये गव्हाचे पीठ घालावे व तुपाचे मोहन पिठामध्ये ओतावे आणि पीठ छान मिक्स करून मळून घ्यावे. पंधरावीस मिनीट पीठ तसेच झाकून ठेवावे.नंतर परत पीठ थोडे मळून घ्यावे आणि आणि पिठाचा गोळा करून जाडसर पोळी लाटून घ्यावी.आणि त्याचे शंकरपाळी च्या आकाराचे काप करून घ्यावे व कढईमध्ये तेल गरम करून शंकरपाळे मंद आचेवर छान तळून घ्यावे. खुसखुशीत गव्हाच्या पिठाची शंकरपाळी खाण्यासाठी तयार.