खुसखुशीत शंकरपाळे – Alka Pethe

1 सपाट वाटी पाणी

3/4 वाटी साखर

वाटी साजूक तूप (नसल्यास डालडा चालेल)

1/4 tsp मीठ

1 वाटीभर कणिक

1 1/2 वाटी मैदा

सपाट वाटी पाणी चांगले गरम झाले की त्यात पाऊण वाटी साखर, पाऊण वाटी साजूक तूप (नसल्यास डालडा चालेल) आणि पाव चमचा मीठ घालावे सगळे एकत्र ढवळून गार झाल्यावर त्यात एक वाटीभर कणिक आणि दीड वाटी मैदा घालून पीठ भिजवावे.

पीठ चांगले घट्ट होईपर्यंत मैदा घालून मळावे.

10ते15 मिनीटे झाली की कढईत रिफाईंड तेल गरम करत ठेवावे.

पिठाचे 7/8 गोळे करून घ्यावे.एका गोळ्याची पोळी पेक्षा थोडी जाड पोळी लाटावी.

सुरीने शंकर पाळे कापून घ्यावे आणि तेल तापले की त्यात एक एक भराभर सोडावे. मध्यम आचेवर तळून घ्यावे.खुसखुशीत शंकर पाळे तयार.

टीप-शंकर पाळे बारीक साइझचे कापले तर उलटावे लागत नाहीत. तळायला सोपे जाते.