खुशखुशीत चकली – Alka Pethe

१ भांडे (फुल पात्र) पाणी पातेल्यात उकळत ठेवा. त्यात चवीनुसार मीठ आणि तिखट, १ टेबल स्पून भरून तेल घाला.

पाणी उकळी आल्यावर खाली उतरून त्यामध्ये १ भांडे भरून भाजणी घालून मिक्स करून झाकून ठेवा. अर्ध्या तासानंतर तुम्ही चकल्या करू शकता.

भाजणी मधे अर्धा चमचा तीळ आणि आवडत असल्यास थोडा ओवा घालावा. हलक्या हाताने मळून घ्यावे व चकल्या पाडून मध्यम आचेवर तेलात तळून घ्याव्या.

टीप-

ह्या पध्दतीने कोणत्याही भाजणी ची चकली करू शकता. कोणतीही भाजणी वापरून कुरकुरीत चकली तयार होईल. चकली हा प्रकार थोडा सरावाने उत्तरं जमू लागतो.

चकली आतपर्यंत कुरकुरीत झाली नाही तर तेलाचे प्रमाण थोडे वाढवावे १च्या ऐवजी दीड चमचा तेल घालून भाजणी भिजवा. मळताना तेलाचा हात घेऊ नये नाहीतर चकल्या विरघळतात.

पहिल्यांदाच करणारीने प्रथम 1 भांड्याच्या प्रमाणात करून पहावे. पीठ अगदी जास्त घट्ट नको की जे मळले जाणार नाही आणि अगदी मऊ नको भाकरी सारखे.त्याकरताच योग्य माप वापरावे. वरील मापाने अगदी व्यवस्थित चकल्या तयार होतील.

चकली आतपर्यंत कुरकुरीत झाली नाही तर तेलाचे प्रमाण थोडे वाढवावे १च्या ऐवजी दीड चमचा तेल घालून भाजणी भिजवा. मळताना तेलाचा हात घेऊ नये नाहीतर चकल्या विरघळतात.

माझ्या भाजणी प्रमाणे चकली केली असता वरील मापाने चकली परफेक्ट होते.

इतर कोणत्याही भाजणी रेसिपी प्रमाणे चकली भाजणी केली असता तेलाचे प्रमाण कदाचित वाढवावे लागेल.

तळताना अगदी मंद किंवा जास्त आचेवर तळू नये, मध्यम आचेवर तळलेली चकली खुसखुशीत होते.