क्लासिक बटर केक – मधुरा पेठे

A perfect cake for every occasion

Ingredients :

मैदा
बटर
रवा
दूध
अंडी
साखर
व्हॅनिला इसेन्स
बेकिंग पावडर
बेकिंग सोडा

Recipe :

रव्यात कोमट दूध घालून १५ मिनिटे ठेवा, तो पर्यंत बाकीची तयारी करून घ्या.
केक टिन ला तुपाचा हात फिरवून घ्या आणि थोडा मैदा भुरभुरुन घ्या
मैदा बेकिंग पावडर बेकिंग सोडा एकत्र करून चाळून घ्या.
बटर अंडी साखर एकत्र करून फेसून घ्या
त्यात मैदा, दूध रव्याच मिश्रण, व्हॅनिला इसेन्स टाकून नीट मिक्स करा.
केक टिन मध्ये ओतून बेकिंग करायला ओव्हन मध्ये ठेवा
१८० डिग्री वर ४० मिनिटे बेक करा. बेक करताना ओव्हन मध्ये खालील कॉईल सुरु ठेवावी
केक तयार होत आला असे दिसले कि त्यात टूथपिक घालून बघावी. जर त्याला काही चिकटले नाही तर केक झाला असे समजावे
त्यानंतर ५ त ७ मिनिटे ओव्हन ची फक्त वरील कॉईल सुरु करून केक वरून भाजून घ्यावा. वरून सोनेरी झाला असे दिसले कि बाहेर काढून थंड करायला ठेवावा.
थंड झालेला केक टिन मधून बाहेर काढून स्लाइस करून सर्व्ह करा किंवा बटर क्रीम आयसिंग करून डेकोरेट करा.

1 Comment

  1. Ingredients मध्ये measurements दिली नाहीयेत.
    किती रवा त्याला मैदा किती हे सर्व द्याल का?

Comments are closed.