इन्स्टंट चकली / Instant Chakali – Madhura Pethe

Quick and easy Chakali Recipe

Ingredients
१ कप तांदूळ पीठ
१/२ कप चणाडाळ पीठ
१/२ उडीद डाळ पीठ
१ १/४ कप पाणी
४) १/२ कप लोणी/बटर
१ tsp मीठ
१ tbsp धने जिरं पावडर
१/४ tsp मिरी आणि लवंग पावडर
१ tbsp ओवा तीळ
१ चमचा मिरची पावडर
१/४ tsp हळदी
तळायला तेल
Recipe
पाणी सोडून इतर सर्व पदार्थ एकत्र करून घ्या
पाणी उकळवून त्यात एक चमचा तेल घाला आणि त्यात पिठाचं मिक्स घाला.
१५ मिनिटे झाकून ठेवा
नंतर हलक्या हाताने मळून त्याचे चकलीच्या सोऱ्याच्या मापाने गोळे करून घ्या.
एकेक गोळा सोऱ्यात घालून चकल्या पाडून घ्या
मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या.
थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवा.
किंवा गरमागरम चकल्या लोणी आणि चहा सोबत सर्व्ह करा.